Hi friends. I'm sure you all must be visiting places you like and must be enjoying to explore.
Even I like to visit places and explore them.
This blog is going to give you a brief idea how you can express your experience about travelling.
You can write about your experience which is also called a travelogue.
I've penned down a travelogue of my experience on SINHGAD .
माझा पहिला अविस्मरणीय निवासीय ट्रेक
प्रिय मित्रांनो
नमस्कार, माझे नाव लिखित; मी आज तुम्हाला माझ्या गिर्यारोहण संस्थे विषयी काही माहिती
सांगणार आहे. मी गिरीप्रेमी
नावाच्या एका संस्थेमार्फत छोट्या - छोट्या ट्रेकला नेहमी जात असतो. मला माझा एक
अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. गिरीप्रेमी ही संस्था इसवीसन 2015 पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत आपल्यासारख्या मुलांना ट्रेकिंग बद्दल आवश्यकती
माहिती पुरवली जाते. मित्रांनो जसे आपल्याला शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दल शिकवले
जाते तसेच गिरीप्रेमी या संस्थेत आपल्याला वेगवेगळ्या पर्वत शिखर बद्दल तसेच
ट्रेकिंग बद्दल व ट्रेकिंगला
लागणाऱ्या वेगवेगळ्या साहित्याबद्दल माहिती दिली जाते व वेगवेगळ्या गोष्टी
शिकवल्या जातात. या संस्थेमार्फत सर्व वयोगटातील मुला-मुलींना अनुभवी प्रशिक्षकांद्वारे
गड -किल्ले चढण्याचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते.मला गड-किल्ल्यांचे आकर्षण
असल्यामुळे मी या संस्थेला गेल्या काही महिन्यांपूर्वी जोडला गेलो. या संस्थेबरोबर
काही एकदिवसीय ट्रेक केल्यानंतर आम्ही या महिन्यात एका निवासी ट्रेक ला गेलो होतो
तिथले काही माझे अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो.
ऑक्टोबर महिन्यामध्ये गिरीप्रेमी द्वारे आयोजित केलेल्या निवासी
ट्रेक साठी माझी नाव नोंदणी केली होती. या ट्रेक मध्ये माझ्यासोबत माझा भाऊ देखील होता. आमचा ट्रेक ऑक्टोबर महिन्यातील
20 तारखे पासून 23 तारखेपर्यंत
होता. मी वाट बघत होतो
की कधी आमची परीक्षा संपेल आणि कधी मी ट्रेकला जाईल. खरच 19 ऑक्टोबर पर्यंत माझी ट्रेकला
जाण्याची संपूर्ण तयारी झाली व लागणारे साहित्य जमा झाले. पण 19 तारखेला रात्री आम्हाला असे
कळाले की पुण्यात होणाऱ्या पावसामुळे 20 ऑक्टोबर चा नियोजित असलेला आमचा ट्रेक एक दिवसाने पुढे ढकलण्यात
आला आहे. माझी थोडीशी निराशा झाली पण या निराशे बरोबर थोडा आनंदही झाला, कारण 21 ऑक्टोबरला माझ्या बाबांचा वाढदिवस
असतो. मनात एक खंत होती की, मला या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता
येणार नाहीत. पण आता ट्रेक 21 तारखेला असल्यामुळे मी बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जाऊ
शकतो याचा आनंदही होता. शेवटी तो दिवस उजाडला...
दिवस पहिला
21 तारखेला सकाळी लवकर उठून बाबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही आम्हाला दिलेल्या सूचनेनुसार सकाळी 6 वाजता
फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर पोहोचलो. गिरीप्रेमीच्या दादांनी पालकांना कॅम्प बद्दल
जुजबी माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही बसने सिंहगडा साठी निघालो. प्रवास तसा फार लांबचा
नव्हता. एका तासाभरात आम्ही आमच्या बेसविलेजला पोहोचलो. तिथून आमची रकसॅक (trekking sack) जीपने वर पाठवली गेली व आम्ही एक
डे – सॅक (small bag) ज्याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या
व पोंचो (रेनकोट) होता. ती घेऊन भूषण दादा बरोबर
गडाच्या पायथ्याशी तासाभरात पोहोचलो. तिथे जात असताना भूषण दादा ने आम्हाला त्याने,
स्वतः हा प्रवास 28 मिनिटात धावत
जाऊन पूर्ण केलेल्या त्याच्या रेकॉर्ड बद्दल सांगितले. येथून आम्ही आमच्या रकसॅक
घेऊन पुणे दरवाजा 1 मधून प्रवेश करून आमच्या कॅम्प साईट वर पोहोचलो. खूप
चालल्यामुळे सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. सगळ्यांनी ब्रेड - बटर, गरमागरम पोहे
व बोर्नविटावर ताव मारला. नंतर आम्ही थोडावेळ आराम केला. मग आमचे वेगळे - वेगळे गट
तयार करण्यात आले. प्रत्येक गटाला हिमालय पर्वतातील पहिल्या 8 उंच शिखरांची नावे
देण्यात आली. पहिल्या दिवशी आम्हाला ट्रेकिंगला जाताना आपली बॅग कशी भरायची व
रचायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. दुपारच्या जेवणानंतर आम्हाला ट्रेकिंग साठी
लागणाऱ्या विविध साहित्याची ओळख करून देण्यात आली व तसेच दोरीच्या वेगवेगळ्या
प्रकारच्या गाठी कसे माराव्यात व सोडवाव्यात ते शिकवण्यास आले. शिकवण्यात आल्या. त्यानंतर
भूषण दादाने आम्हाला नागफणी (Dukes nose )वर शॉर्ट फिल्म दाखवली. त्यानंतर दिनेश दादा ने आम्हाला नागफणी
मोहीम व कांचनजंगा मोहीमे बद्दल माहिती दिली. अशारीतीने या निवासी कॅम्पचा पहिला
दिवस पार पडला आणि जेवल्यानंतर स्लीपिंग बॅग मध्ये घुसून दुसऱ्या दिवसाच्या नियोजनामध्ये
आम्ही कधी गाढ झोपलो हे आम्हाला कळले देखील नाही.
दिवस दुसरा
सकाळी 7:00 वाजता आम्ही
उठलो. सकळी 7:45 वाजता गरमागरम उपमा, ब्रेड –
बटर, केळी व बॉर्नविटा अशा नाष्टा होता. नाष्टा करून आम्ही आजच्या दिवसाकरता सज्ज
झालो. या दिवशी आम्ही
वेगवेगळे सात खेळ खेळलो. हे नेहमीसारखे खेळ नव्हते बरं का मित्रांनो. या खेळांमधून
आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या.
खेळाचे नाव
|
गूण
|
|
1)
|
Tent pitching
|
to pitch a tent.
|
2)
|
Sheep and Shepherd
|
Co-ordination
|
3)
|
Tie – Untie
|
Leading with Others
|
4)
|
Balancing on the Rope
|
Concentration
|
5)
|
Roller Coaster
|
Team Work
|
6)
|
Acid Walk
|
Balancing
|
7)
|
Carpet Flipping
|
Brain Storming
|
दिवसभर खेळ
खेळताना झालेल्या धावपळीमुळे दमून आम्ही थकलेली सर्व मुले रात्री पोटभर जेऊन
निद्रा देवीच्या अधीन
झालो.
दिवस तिसरा
आज आम्ही थोडे लवकर म्हणजे सकाळी 6:30 वाजता उठलो आणि नाष्टा लवकरच केला. आम्हाला असे सांगण्यात आले की आज
आम्ही धमाल करणार आहोत हा विचारच किती उत्साहित करणारा होता!!!
आज आम्ही कल्याण
दरवाजातून खाली उतरून कल्याण गावी जाऊन परतणार होतो. पाऊस बंद होता पण सगळीकडे मात्र
पाणी साचलेले होते. त्यातूनच आमचा प्रवास सुरु होता या प्रवासात कोणी घसरले कोणी
पडले पण या घसरण्यात व पडण्यात ही वेगळाच आनंद होता. असा गमतीशीर प्रवास करत आम्ही
पायथ्याशी पोहोचलो. आम्ही तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला आणि काहीवेळाने
परतीच्या प्रवासासाठी निघालो.
परत आल्यावर आम्हाला पृथ्वीराज दादाने कोणाला साप चावला, कोणी बेशुद्ध झाले तर याच्यावर
लवकरात लवकर काय प्रथमोपचार कसे करावेत
याबद्दल माहिती सांगितली. मित्रांनो आज दुपारच्या जेवणात आम्ही सिंहगड स्पेशल
पिठलं-भाकरी, कांदा – भजी, वरण-भात, वांग्याची भाजी व मटका दही अशे वेगवेगळे पदार्थ पोट भरून खालले . आज संध्याकाळचे
जेवण मात्र आम्ही स्वतः बनवणार होतो आणि तेही चुलीवर बरं का ! आज आमचा कस लागणार
होता.
चूली साठी लागणारे दगड व ती पेटवण्यासाठी लागणारी लाकडे हे साहित्य
शोधण्यासाठी आम्ही आजूबाजूला फिरलो. सर्व साहित्याची जमवाजमव करून आम्ही आता चूल
पेटवण्यासाठी सज्ज झालो होतो. आता आम्ही चूल पेटवण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच
त्याच वेळी प्रत्येक गटामधून दोन - दोन मुलांना झाडावर जुमारिंग करण्यासाठी
बोलावण्यात येत होते. हूश्श... आमच्या अथक परिश्रमानंतर शेवटी एकदाची आमची चूल
पेटली. भांडे काळे होऊ नये म्हणून पातेल्याला खालून ओली माती लावलेली, पातेले
ठेवून आम्ही तापलेल्या तेलात जिरे - मोहरी ची फोडणी दिली. त्यात कांदा - टोमॅटो घालून
परतला. तिखट, मीठ, हळद, डाळ-तांदूळ घालून एकत्र करून घेतले त्यात पाणी घातले आणि
पातेल्यावर झाकण ठेवले.
आता आम्ही वाट
बघत होतो ती खिचडी शिजण्याची. दिलेला वेळ संपून गेला पण आमची खिचडी काही शिजेना,
शेवटी आम्ही चूल विझवली आणि आता आम्हाला आम्ही बनवलेली खिचडी परीक्षकांच्या समोर
परीक्षणासाठी सादर करायची होती, पण अर्धी शिजलेली खिचडी कशी सादर करायची हा मोठा
प्रश्न होता. थोडे डोके चालवून आम्ही खिचडीतले पाणी वेगळे काढले आणि खिचडी वेगळी
केली. त्या मसालेदार पाण्याला आम्ही सूप असे घोषित केले आणि आमची खिचडी व सूप
परीक्षकां समोर सादर केले. आम्हाला बक्षीस मिळाले नाही पण आम्ही सूपची शक्कल लढवून
वेळ सांभाळून घेतली.
अशाप्रकारे खिचडीच्या निकालानंतर आम्ही जेवून गाढ झोपी गेलो.
दिवस चौथा – अंतिम दिवस
आज आम्ही अजूनच लवकर म्हणजे सकाळी 5:00 वाजताच उठलो आज आमची लेखी व तोंडी परीक्षा होती त्यानंतर आम्ही
परतीच्या प्रवासाला निघणार होतो. आज आम्ही घरी जाणार होतो, मात्र कोणीही खूश नव्हते.
सर्वजणांना अजून काही दिवस तिथे थांबायचे होते पण ते शक्य नव्हते. दादाने आम्हाला
गिरिप्रेमी चा टी-शर्ट दिला व आम्ही ग्रुप फोटो काढून परतीला निघालो. दुर्दैवाने
परत जोरत पाऊस सुरू झाला व आम्हाला गड पाय - उतार होता आले नाही, आम्ही जीपने खाली
उतरलो. गड उतरल्यावर आम्ही वडापाव खाल्ला आणि बसने फर्ग्युसन कॉलेजला परत आलो ते या
सगळ्या गोड आठवणींची शिदोरी घेऊन. असे हे माझे पहिले अवस्मरणीय निवासीय ट्रेक चे
गोड अनुभव व आठवणी घेऊन...
I would love to read your Travelogues.
choudhary.likhit@gmail.com
Please follow my blogs by clicking the blue button on top (For Laptops) or by writing your e - mail in the Box at the top. (For Mobile)
Please Suggest me in the comments for more topics to write on.
Please Suggest me in the comments for more topics to write on.
Good...असेच तुझ्या सर्व ट्रक बदल लेख लिहून ठेव..तू जेव्हा मोठा होशील तुला ते वाचुन खुप आनंद होइल...
ReplyDeleteOf course sir
DeleteMastttttttttt......Jay Shivaji
ReplyDeleteJAY SHIVAJI, JAY BHAVANI
Delete"CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY"
Yes Likhit Nicely written, and alos i have enjoyed Treking with you on the pashan tekdi in rainy season....😘😘😘😍
ReplyDeleteMassttt👌👍👍👌
ReplyDeleteLikhit,it's Apurva here.Really admireable blogs👏👏👏
ReplyDeleteVery well written likhit.. keep it up.
ReplyDeleteVery nice keep it up
ReplyDelete